प्रेम प्रकरणातून पत्नीने केला पतीचा खून!
फलटण : खरा पंचनामा
एका तरुण महिलेने आपल्या पतीचा खून केला असून तिचे दुसऱ्याच एका तरुणावर प्रेम होते, मात्र पती अडथळा ठरत असल्याने तिने प्रियकराच्या मदतीने त्याचा काटा काढल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
शहरातील शिवाजीनगरमधील अजित बुरुगले (वय २४) हा बेपता झाला होता. याबाबत पोलीसांनी चौकशी केली, तेव्हा पत्नीच्या प्रेमप्रकरणामुळे अजित याची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने अजितचा खून केला. मृतदेह अजितचा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले, त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांचा आधार घेत पत्नीची कसून चौकशी केली. चौकशीत पत्नीचे करण भोसले (रा. थेऊर रोड, पुणे) या तरूणाशी प्रेमसंबंध असल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रेमसंबंधात आणि लग्न करण्यात नवरा अडथळा वाटू लागला होता.
करणने त्याचा साथीदार राहुल इंगोले (वय २२ रा. वाघोली, पुणे) याची मदत घेतली. त्यानंतर करणने अजितला घरातून बोलवून त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी नीरा कालव्यामध्ये मृतदेह टाकून दिल्याची कबूली करणने दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.