ड्रीम 11 वर दीड कोटी जिंकलेले पीएसआय सोमनाथ झेंडे निलंबित
पिंपरी चिंचवड : खरा पंचनामा
पिंपरी चिंचवडमधील करोडपती पीएसआय सोमनाथ झेंडे यांचे अखेर निलंबन करण्यात आलेलं आहे. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका झेंडेंवर ठेवण्यात आलाय.
पण विभागीय चौकशीत त्याला स्वतःचं म्हणणं मांडण्याची मुभा मिळणार आहे. क्रिकेट वल्ड कप मॅचवेळी झेंडेंनी ड्रीम 11 या ऑनलाइन गेममध्ये स्वतःची टीम लावली अन त्यात ती अव्वल ठरली. त्यामुळे झेंडे अवघ्या आठ तासांत करोडपती झाले.
दीड कोटींची त्यांना लॉटरी लागल्यानं त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. याच आनंदाच्या भरात झेंडेंनी वर्दीत माध्यमांना मुलाखती दिल्या अन हीच चूक त्या आनंदावर विरजण टाकणारी ठरली. पिंपरी चिंचवड पोलिसांनीच त्याची चौकशी केली अन यात त्याचं निलंबन करण्यात आलं. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला, आता पुढं विभागीय चौकशी होईल त्यात त्यांना स्वतःच म्हणणं मांडता येणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.