महाराष्ट्रातील 3 आयपीएस अधिकाऱ्यांवर पाच वर्षांची बंदी!
नवी दिल्ली : खरा पंचनामा
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यातील तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर पाच वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
गृहमंत्रालयाकडून देशभरातील आठ अधिकाऱ्यावर ही गृहमंत्रालयाकडून देशभरातील आठ अधिकाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यात ३ उत्तर प्रदेश, २ हरियाणा तर महाराष्ट्रातील 3 अधिकाऱ्यांचा समोवश आहे. गृहमंत्रालयाच्या या यादीत नागपूर शहर डीसीपी झोन-३ गोरख भामरे यांचा समावेश आहे.
देशातील सर्वच राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांची आयपीएस कार्यकाळ धोरणांतर्गत केंद्रीय प्रतिनियुक्तीवर वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती केली जाते. याकरिता अनेक अर्ज येतात. अधिकारी कॅडर सोडून अधिकारी सीबीआय, एनआयए, बीएसएफ, सीआयएसएफ, राष्ट्रीय पोलिस अकादमी, बीपीआरडी यासह विविध केंद्रीय विभागांमध्ये काम करू शकतात. मात्र, जे अधिकारी नियुक्ती होऊनही पदभार स्वीकारत नाहीत, अशांवर धोरणाच्या परिच्छेद १७ अन्वये ही उपरोक्त कारवाई करण्यात आली आहे. राज्यात भामरे यांच्याशिवाय महाराष्ट्र कॅडरच्या तीन अधिकाऱ्यामध्ये रागसुधा आर आणि २०१५ बॅचचे अतुल विकास कुलकर्णी यांचा समावेश आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.