कराडमध्ये पहाटे स्फोट; 4 जण गंभीर जखमी
कराड : खरा पंचनामा
राहत्या घरात पहाटे स्फोट होऊन चार जण जखमी झाल्याची दुर्घटना आज पहाटेच्या सुमारास कराड शहरातील हद्दवाढ भागातील मुजावर कॉलनी लगतच्या वस्तीत घडली. झालेला स्फोट इतका भीषण होता कि त्यात संबंधित घराची भिंत फुटून समोरच्या घरावर जावून आदळली. त्यामध्ये इमारतीचे मोठे नुकसान झाले असून ४ जण गंभीर जखमी तर अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
शरीफ मुबारक मुल्ला वय 36, सुलताना शरीफ मुल्ला वय 32, जोया शरीफ मुल्ला वय 10, राहत शरीफ मुल्ला वय 7, यांच्यासह अशोक दिनकर पवार वय 54, सुनीता अशोक पवार वय 45, दत्तात्रय बंडू खिलारे वय 80 (सर्व रा. मुजावर कॉलनी, शांतिनगर, कराड) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आज बुधवारी पहाटे मुजावर कॉलनी परिसरात नागरिक झोपेत असताना पाण्याच्या टाकी जवळील शरीफ मुल्ला यांच्या इमारतीत भीषण स्फोट झाला. गॅस सिलेंडरच्या टाकीला गळती लागल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरून गेला. ज्या इमारतीत स्फोट झाला, त्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. भिंती पडल्या आहेत. तीन ते चार वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये दुचाकी गाड्यांचा समावेश आहे. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.