Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबईत ये-जा करणे महागले; आजपासून टोल दरात वाढ

मुंबईत ये-जा करणे महागले; आजपासून टोल दरात वाढ



मुंबई : खरा पंचनामा

मुंबईतील वेशीवर असलेल्या टोल दरात रविवारी 1 ऑक्टोबरपासून 5 ते 20 रुपयापर्यंत वाढ होणार आहे. त्यामुळे मुंबईत ये-जा करणे चारचाकी खासगी वाहनांसह टॅक्सी व मालवाहतूक वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

मुंबई शहरात प्रवेश करण्यासाठी वाशी, मुलुंड पूर्व द्रुतगती महामार्ग, मुलुंड एलबीएस मार्ग, ऐरोली व दहिसर असे पाच टोलनाके आहेत. या टोलनाक्यावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. या वाहनांकडून आता वाढीव टोला करण्यात येणार आहे. रविवार 1 ऑक्टोबरला याची अंमलबजावणी होणार आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावर 2002 पासून टोल वसुली सुरू असून तो 25 वर्ष सुरू राहणार आहे. म्हणजेच 2027 पर्यंत वाहन चालकांना टोल भरावा लागणार आहे.

2002 मध्ये कारसाठी 20 रुपये, मिनीबस 25 रुपये, ट्रक व बस 45, अवजड वाहनांसाठी 55 रुपये टोल होता. 1 ऑक्टोबर 2020 पासून चारचाकी वाहनासाठी 40 रुपये, मिनी बससाठी 65 रुपये, ट्रकसाठी 130 रुपये व अवजड वाहनासाठी 160 रुपये पथकर द्यावा लागत होता. आता सातवी दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 2026 पर्यंत चारचाकी वाहनांसाठी 45 रुपये, मिनी बस 75 रुपये, ट्रक 150 रुपये व अवजड वाहन 190 रुपये टोल भरावा लागणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.