तोपर्यंत उपोषणातून माघार नाही!
आमदार सुमनताई आणि रोहित पाटलांची आंदोलनाची भूमिका कायम
सांगली : खरा पंचनामा
टेंभू पाणी योजनेच्या विस्तारित योजनेच्या प्रशासकीय मान्यतेवरून सांगलीत राजकारण तापले आहे. आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी पाण्यासाठी उपोषणास्त्र उपसल्यानंतर आमदार अनिल बाबर विस्तारित योजनेसाठी थेट मंजूरी आणली.
टेंभू योजनेच्या विस्तारीकरणासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) मंजूर झाल्याने उपोषण आंदोलनातील हवा काढून घेण्यात आली अशी चर्चा रंगली आहे. असे असतानाच रोहित पाटील यांनी भूमिका स्पष्ट करत आंदोलनावर ठाम असल्याचे म्हटले आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे सांगितले.
भू सिंचन योजनेच्या ८ टीएमसी पाण्यास मुख्यमंत्र्यांची अंतिम मंजूरी मिळाल्याशिवाय शेतकरी अजिबात उपोषणावरून उठणार नाही.
रोहित पाटील यांनी सर्व चर्चा फेटाळून लावत आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसू नये. सुप्रमा मंजूर केली आहे, तर काम कधी सुरू करणार? लिखित स्वरूपात द्यावे, असे सांगितले. ते म्हणाले की, आमचं आंदोलन यशस्वी झालं आहे. आमच्या आंदोलनामुळेच भागासाठी पाणी आरक्षित करण्यात आले. आम्ही पत्र दिल्यानंतर अंतिम मान्यता मिळाली. शेतकऱ्यांचा प्रश्न असतानाही केवळ राजकारणासाठी इतकी वर्षे पूर्ण मान्यता देण्यासाठी विलंब का करण्यात आला? अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. ते पुढे म्हणाले की, आमचा सरकारला सवाल आहे की, मान्यता देऊन फक्त थांबू नये तर अंतिम मंजूरी मिळाल्याशिवाय शेतकरी अजिबात उपोषणावरून उठणार नाही, असेही रोहित पाटील म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.