शिक्षकाला तुरुगात डांबणं पोलिसांना पडलं महाग; मुंबई उच्च न्यायालयानं ठोठावला दोन लाखाचा दंड!
मुंबई : खरा पंचनामा
शिक्षकाला नग्न करुन तुरुगात डांबणं पोलिसांना चांगलच महागात पडलं आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना दोन लाख रुपयाची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठानं हे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
शिक्षकानं वर्गातील विद्यार्थिनीला असभ्य भाषेत बोलल्याची तक्रार मुंबई पश्चिम उपनगरातील मालाड पोलीस ठाण्यात जून 2023 मध्ये दाखल करण्यात आली होता. मालाड पोलिसांनी ही तक्रार मुंबईतील ताडदेव पोलीस ठाण्यात वर्ग केली. मात्र त्यानंतर 7 जुलै 2023 रोजी लैंगिक छळ करुन महिलेचा अपमान केल्याच्या तक्रारीवरुन या शिक्षकाला मुंबईतील सात रस्ता इथं रात्री पोलिसांनी काही काळ तुरुंगात ठेवलं होतं. या शिक्षकानं बेकायदेशीरपणानं तुरुगात डांबून ठेवल्याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली. शिक्षकाच्या वतीनं ही बाब वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिली. तुरुगात शिक्षकाला नग्न करुन त्यांचा मानसिक छळ करण्यात आल्याचा दावा वकिलांनी केला. त्यांनी हात जोडून विनवणी केल्यानंतर त्यांना त्यांचे कपडे परत देण्यात आल्याचा दावाही यावेळी न्यायालयात करण्यात आला.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी याबाबत आदेशपत्र जारी केलं. यात पोलिसांनी या शिक्षकांसोबत प्रचंड सक्ती केली आहे. कोणतीही दया दाखवली नाही. कोणत्याही कायदेशीर तरतुदीचं पालन केलं नाही. पोलिसांचं कायद्याबद्दलचं अज्ञान आणि बेफिकिरी तसेच अहंकाराची वागणूक यातून दिसते. त्यामुळेच त्यांना दोन लाख रुपये दंड करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.