Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

स्वतःवर गोळी झाडून, एपीआयने केली आत्महत्या!

स्वतःवर गोळी झाडून, एपीआयने केली आत्महत्या!



सोलापूर : खरा पंचनामा

मुळ सोलापूरचे राहणारे आणि नांदेड मध्ये पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आनंद मळाळे यांनी शनिवारी पहाटे सोलापुरातील स्वतःच्या राहत्या घरी रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. गेल्या महिन्याभरापासून आनंद मळाळे हे आजारी रजेवर सोलापूरला आपल्या घरी आले होते.

संबंधीत घटना ही वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून केली असल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. त्याच्याकडे सुसाईड नोटही असल्याचे समजते. घटनेच्या वेळी त्यांची पत्नी त्यांचा शोध घेत होती मात्र ते घराच्या बाहेर मृतावस्थेत पडले होते. घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजू मोरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

त्यांचा एक-दीड महिन्यापूर्वी ड्यूटीवर असताना अपघात झाला होता. डोक्याला जबर मार लागला होता. अशी माहिती मिळतेय. सिव्हील मध्ये मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिल्याने सिव्हील मध्ये गर्दी झाल्याचे समजते. मळाळे हे सध्या नांदेड जिल्ह्यातील बिलोली पोलीस ठाण्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.