अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर मराठा आंदोलकांची दगडफेक, सोळंकेंच्या बंगल्यामधून धुराचे लोळ
बीड : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांची दगडफेक करण्यात आली आहे. मनोज जरांगेच्या संदर्भात सोळंकेंनी काल वक्तव्य केलं होतं. मागील एक तासापासून दगडफेक होत आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यामधून धुराचे लोळ येत असल्याचं दिसत आहे.
आमदार प्रकाश सोळंके बोलताना म्हणाले की, "मी माजलगावमध्येच आहे. मी घरातच आहे. आज सकाळी अचानक काही आंदोलक माझ्या घरी आहे. माझ्या घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. घराचं, ऑफिसचं आणि गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. आपल्या माध्यमातून मी सर्व आंदोलकांना विनंती करणार आहे की, मी मराठा समाजाचाच आमदार आहे आणि माझाही मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. आरक्षण मिळावं अशी माझीही मागणी आहे. काही राजकीय विरोधक असतात जे काही बाबतीत चिथावणी करु शकतात. माझा कोणत्याही आंदोलकांवर राग नाही, मी त्यांच्या भावना समजू शकतो की, त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे अशा बाबतीत राजकीय विरोधक संधी घेतात, असाच प्रकार याबाबतीत झाला असल्याचं मला वाटतं."
"मला आंदोलकांशी बोलण्याची संधीच मिळाली नाही. माझ्या घरावर थेट दगडफेक करायला सुरुवात केली. कोणी काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हतं. माझ्या घराला चारही बाजूंनी वेढा दिला. त्यामुळे चर्चा करण्याचा प्रश्नच आला नाही. मी पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून विनंती करतो की, माझाही मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा आहे. मीसुद्धा मराठा समाजाचाच आमदार आहे. काहीजण अर्धवट क्लिप काढून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.