दसऱ्याला मराठा आरक्षणाचे तोरण बांधणार, राज्य सरकारचे संकेत
मुंबई : खरा पंचनामा
'धोरण आखले आहे, तोरण बांधण्याचे!, मराठा आरक्षणाचे वचन पूर्ण करण्याचे' असे म्हणत राज्य सरकारने दसऱ्याच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. या संदर्भातील पोस्ट फडणवीस यांनी त्यांच्या X (पूर्वीचे ट्विटर अकाऊंटवरून केली आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देताना मराठा आरक्षणासाठी हे सरकार कठीबद्ध असल्याचे देखील म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. २३) दसऱ्यानिमित्त सरकारी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, मराठा समाजाच्या हक्काचे संविधानाच्या चौकटीत व न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे आरक्षण देण्यास हे शासन बांधील आहे. त्यामुळे मराठा बांधवांना मराठा आरक्षणाचे दिलेले वचन पूर्ण करणार असल्याचे संकेत आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.
तत्पुर्वी काल (दि.२२) ठाणे येथे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा मी शब्द दिला आहे. त्यामुळे माझ्या भावांनो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाखमोलाचे आहात, असे भावनिक आवाहन केले. तसेच राज्य सरकार मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे येथे बोलताना सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.