पाच हजार पुरावे सापडले, खेळ बंद करा आणि मराठा आरक्षण जाहीर करा!
अहमदनगर : खरा पंचनामा
मराठा आरक्षणासाठी नियुक्त केलेल्या समितीला पाच हजार पुरावे सापडले आहेत. सरकारने आता हा खेळ बंद करून तात्काळ मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी अहमदनगर येथे केली.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोजरांगे पाटील यांची शनिवारी रात्री बारा वाजता अहमदनगर येथील नवनागापुर एमआयडीसी येथे सभा झाली. या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले मराठा आरक्षणासाठी सरकारने तीस दिवसांची मुदत मागितली होती. त्यांना आणखी १० दिवस म्हणजे ४० दिवसांची मुदत दिली आहे. यातील ३० दिवस १४ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाले आहेत. आरक्षणासाठी नेमलेली समिती मुंबई, हैदराबाद आणि संभाजीनगर येथे इमानाने फिरते आहे.
आरक्षणाबाबतचे पाच हजार रुपये या समितीला सापडले असल्याची माहिती मिळालेली आहे. कोणताही कायदा तयार करताना त्यासाठी आधार लागतो. आता पाच हजार पुरावे हाच मोठा आधार असून, त्यानुसार राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे. मराठा समाजाची एकजूट झाली आहे. ही एकजूट जाऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मराठ्या समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. सरकारने सभेसाठी उपस्थित असलेले डोके मोजू नये. त्यांच्या वेतनात समजून घ्याव्यात, असेही जरांगे पाटील म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.