Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यात २४ मिनिटे चर्चा!

मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यात २४ मिनिटे चर्चा!



जालना : खरा पंचनामा

मराठा आरक्षण प्रश्नावरून महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून, त्यांची प्रकृती खालवत आहे. त्यांनी वैद्यकीय उपचारासही नकार दिला आहे.

त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून, मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यात २४ मिनिटे चर्चा झाली असल्याचे वृत्त आहे.

जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागण्यांवरून ठाम असून अंतरवाली सराटी येथे त्यांचे उपोषण सुरू आहे. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे. दरम्यान, कोणत्याही उपचार घेण्यास नकार देत, शांततेत आंदोलन सुरु ठेवण्यावर ते ठाम आहेत. आज (दि. ३१) उपोषणाच्या सहाव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून काही वेळेपूर्वी चर्चा केली. 

अर्धवट आरक्षण नको, संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली. तसेच जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नी अभ्यासकांना बोलावले असून, अभ्यासकांशी चर्चा करून पुन्हा जरांगे-पाटील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.