सांगली ग्राहक आयोगाच्या अध्यक्षपदी प्रमोद गिरी- गोस्वामी
सांगली : खरा पंचनामा
सांगली ग्राहक आयोगाचे नूतन अध्यक्ष म्हणून प्रमोद गोकुळ गिरी-गोस्वामी यांनी पदभार स्वीकारला. चांगली ग्राहक आयोगाचे अध्यक्षपद २२ सप्टेंबर २०२३ पासून रिक्त होते.
गेल्या 17 वर्षापासून गिरी-गोस्वामी हे वकिली व्यवसायात आहेत. आतापर्यंत त्यांनी पुण्याशिवाय मुंबई हायकोर्टचे औरंगाबाद खंडपीठ येथे देखील वकील व्यवसाय केला आहे. गिरी-गोस्वामी यांनी ग्राहक आयोगाचे अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच पदभार स्वीकारला आहे. 6 ऑक्टोबर रोजी गिरी गोस्वामी यांनी सांगली ग्राहक आयोगाचे नूतन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. वकील संघटनेतर्फे गिरी-गोस्वामी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ॲडव्होकेट कुडाळकर, जाधव, परांजपे नरवाडे, श्रीमती सागावकर, श्रीमती पाठक, सूर्यवंशी, वैभव केळकर आदींसह वकील मंडळी उपस्थित होते अशी माहिती सांगली ग्राहक आयोगाचे प्रबंधक एन. बी. कुनाळे यांनी दिली
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.