जीएसटी परिषदेचा साखर कारखाने व डीस्टिलरीज यांना मोठा दिलासा!
नवी दिल्ली : खरा पंचनामा
दारू साठी लागणारे एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल वरील जीएसटी माफी तर मोलासीस वर GST चा दर २८ वरून ५ % करण्यात आला आहे. आज झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल वरील जीएसटी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने साखर कारखाना व डीस्टिलरीज ना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील सप्टेंबर महिन्यात केंद्रीय जीएसटी विभागातर्फे शेकडो कोटींच्या नोटिसा सांगली- कोल्हापूर मध्ये बजावण्यात आल्या आहेत. राज्य शासनातर्फे यावर 20 टक्के व्हॅट आकारण्यात येतो तर केंद्रीय जीएसटी विभागाचे मते यावर 18 टक्के जीएसटी आहे असे आहे.
मात्र जर जीएसटी परिषदेने याला माफी दिल्याने तर राज्य शासनाचा यावर व्हॅट लावण्याचा अधिकार आहे किंवा कसे यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. मोलासिस वरिल दर कपातीचा (२८ टक्के ते ५ टक्के) यामुळे शेतकऱ्यांना जादा पैसे मिळतील तसेच पशुखाद्य स्वस्त होइल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.