मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे, उद्धव ठाकरेंच्या भेटीला!
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी भेट झाली. ही बैठक जवळपास दीड तास चालली.
महाराष्ट्रात उद्धव यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय पांडे मुंबईचे पोलीस आयुक्त होते. आता पांडे आणि ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. शुक्रवारी (20 ऑक्टोबर) रात्री उशीरा झालेल्या भेटीत संजय पांडे आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? हे अद्याप समजलेलं नाही.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कडून कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंगशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात संजय पांडे यांना दिल्ली उच्च न्यायालयाने डिसेंबर महिन्यात जामीन मंजूर केला आहे. ईडीने जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जे 8 मे 2023 रोजी फेटाळण्यात आले.
ED ने पांडे यांना 19 जुलै 2022 रोजी, संजय पांडेंच्या निवृत्तीनंतर काही दिवसांनी अटक केली होती आणि 24 सप्टेंबर रोजी, CBI ने नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कर्मचारी प्रकरणात कथित बेकायदेशीर फोन टॅप प्रकरणी देखील अटक केली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.