पुणे-मिरज रेल्वे वर्षाखेरीस धावण्याची शक्यता!
पुणे : खरा पंचनामा
बहुप्रतीक्षित पुणे-मिरज दुहेरीकरणाचे काम आता 84 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून, यातील 60 टक्के दुहेरीकरणाच्या मार्गावर रेल्वेगाडी धावण्यास सुरुवात झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस पुणे-मिरज दुहेरीकरणाच्या 90 ते 100 टक्के मार्गावर रेल्वेगाडी धावणार असल्याची शक्यता रेल्वेच्या वर्तुळातून वर्तविली जात आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत पुणे-मिरज दुहेरीकरणाचे काम सुरू आहे.
हे काम पूर्ण होऊन पुणे आणि मिरजकरांना वेगवान सेवा मिळावी, याची प्रतीक्षा आहे. मात्र, गेले काही महिने पावसामुळे याचे काम रेंगाळले होते. आता मात्र, ते युद्धपातळीवर सुरू असून, फक्त 16 टक्के काम बाकी राहिले आहे. तेदेखील लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचा विश्वास रेल्वेकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुणे-मिरज मार्गावरील मातीची कामे, मोठे पूल, लहान पूल, रोड ओव्हरबि-ज, बोगदे, स्टेशन बिल्डिंग, ट्रॅक लिंकिंग, सिग्नलिंग इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, विद्युतीकरण यासह अनेक कामे वेगाने सुरू आहेत. यात साफळे-आदरकी 277 मीटरचा बोगदा पूर्ण झाला आहे. आदरकी - वाठार दरम्यानच्या 169 मीटरच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून आंबळे-शिंदवणे जवळच्या 110 मीटर बोगद्याचे काम सुरू आहे. असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.