साताऱ्यात शंभूराज देसाईच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार!
सातारा : खरा पंचनामा
राज्य उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या राज्यभरात होणाऱ्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने घेण्यात आला आहे.
पत्रकार परिषदांमध्ये कोणत्याही प्रश्नाची माहिती न घेता पत्रकारांनाच आपला प्रश्न अपुऱ्या माहितीच्या आधारे आहे. असा प्रतिप्रश्न करण्याचा तसेच आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधिल नाही असे उत्तर देण्याचा प्रकार त्यांच्याकडून सातत्याने होत आहे. त्यामुळे जर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास ते बांधिल नसतील तर पत्रकार परिषदेला जाण्यासही पत्रकार बांधील नाहीत. त्यामुळे राज्यभरात त्यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून याला सर्व संघटनांनाचाही पाठिंबा आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक, परिषदेचे राज्याध्यक्ष शरद पाबळे यांच्या सूचनेनुसार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शरद , जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे, सातारा पत्रकार संघ काटकर, अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, प्रसिध्दी प्रमुख दीपक शिंदे, परिषद प्रतिनिधी सुजित आंबेकर, राज्य महिला सरचिटणीस विद्या म्हासुर्णेकर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निमंत्रक राहुल तपासे, समन्वयक शंकर मोहिते, डिजिटल मीडिया राज्य उपाध्यक्ष सनी शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, तुषार भद्रे, मराठी पत्रकार परिषद सलग्न सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मीडिया संघ, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मीडिया परिषद, 11 तालुक्यांचे पत्रकार संघ यांनी हा निर्णय जाहीर केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.