Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जीएसटीकडून स्क्रॅप व्यापाऱ्याला अटक! हॉटेल, केटरिंग बरोबर आता स्क्रॅप डीलर राहणार रडारवर

जीएसटीकडून स्क्रॅप व्यापाऱ्याला अटक!
हॉटेल, केटरिंग बरोबर आता स्क्रॅप डीलर राहणार रडारवर



मुंबई : खरा पंचनामा

वस्तू व सेवाकर विभागाने करचोरी प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे.जीएसटी विभागास नॉन-फेरस मेटल मार्केटमधील निकेल व्यापारात जीएसटी  फसवणूक उघड करण्यात यश आले आहे.

करचुकवेगिरी करणाऱ्या कंपन्यांवर केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत कारवाईचा एक भाग म्हणून  जीएसटी विभागाने मेसर्स नवकार मेटलचे ऑपरेटर आणि मालक सुनील कुमार बी. पिचोलिया याचा एकूण कर रक्कम रु. १५.८७ कोटीच्या, निकेल धातूच्या  ८० कोटीपेक्षा जास्त रकमेच्या विक्री च्या गैर व्यवहारांचा समावेश आढळून आला. यानंतर त्याला अटक करण्यात आलं.

मुंबईचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी आरोपी सुनीलकुमार बी. पिचोलिया याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

सध्या निकेल धातू हा सर्वात महागड्या मौल्यवान धातूंपैकी एक आहे आणि इलेक्ट्रिक, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीद्वारे याच्या प्रचंड मागणीमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.