Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आंध्रप्रदेशमधील दरोड्याप्रकरणी तिघांना अटक; तीन किलो सोने जप्त आंध्रप्रदेश पोलिस, सांगली एलसीबीची कारवाई

आंध्रप्रदेशमधील दरोड्याप्रकरणी तिघांना अटक; तीन किलो सोने जप्त
आंध्रप्रदेश पोलिस, सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

आंध्रप्रदेश येथील गलाई व्यावसायिकाच्या घरात सशस्त्र दरोडा टाकून सोन्याची लूट करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १.७७ कोटी रूपयांचे तीन किलो सोने, रोकड, मोबाईल जप्त करण्यात आले आहे. टूनूक टाऊन पोलिसांच्या सहकार्याने सांगलीच्या एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

गलाई कामगार सूरज बळवंत कुंभार (वय ३३, रा. क़ुर्ली, ता. खानापूर, जि. सांगली), कैलास लालासो शेळके (वय ३०, रा. बामणी, ता. खानापूर, जि. सांगली), सादीक ताजुद्दीन शेख (वय ३५, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नामदेव देवकर यांचा आंध्रप्रदेशमधील टुनूक येथे गलाईचा व्यवसाय आहे. शिवाय ते सोने तारण व्यवसायही करतात. यातील संशयित गलाई कामगार सूरज कुंभार हा गेल्या चार वर्षापासून त्यांच्या दुकानात काम करत होता. देवकर पत्नीसमवेत घरात असताना कुंभार याने अन्य साथीदारांच्या मदतीने त्यांचे हात-पाय बांधून, त्यांना हत्याराचा धाक दाखवून घरातील तिजोरीतून सोन्याचे दागिने, बिस्कीट, रोख एक लाख रूपये असा ऐवज लंपास केला होता. 

याप्रकरणी देवकर यांनी टुनूक टाऊन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याच्या तपासासाठी आंध्रप्रदेश पोलिस तपासासाठी सांगलीत आले होते. दोन्ही पोलिसांच्या संयुक्त पथकाला यातील संशयित बुधगाव येथील एका ढाब्यासमोर थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून तीनही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ तीन किलोचे सोने सापडले. ते जप्त करून तिघांनाही अटक करण्यात आली. तिघांनाही आंध्रप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

आंध्रप्रदेशचे पोलिस उपअधीक्षक सी. सरथ राजकुमार, सर्कल निरीक्षक सी. एच. अंजनेवेलू, सांगली एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मागर्दशर्नाखाली सी. एच. व्यंकटेशराव, उपनिरीक्षक डी. आदीनारायण, के. एस. रेड्डी, एस. श्रीधर, एस. के. अकबरलाल, सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार, सिकंदर वर्धन, उपनिरीक्षक कुमार पाटील, संदीप गुरव, बिरोबा नरळे, सागर लवटे, अमर नरळे, शुभांगी मुळीक, ज्योती चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.