पोलिसांनीच मांडला डाव, थेट अधीक्षकांनी जुगारी पोलिसांना पकडले!
परभणी : खरा पंचनामा
परभणीत पोलीस अधीक्षकांनीच जुगारी पोलिसांवर छापा टाकत सात जणांना पकडले आहे. परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयातील आरसीबीच्या रेस्ट रूममध्ये हे सात पोलीस कर्मचारी जुगार खेळत होते. दरम्यान, याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांनी थेट या ठिकाणी जात सात जणांना रंगेहात पकडले आहे. तसेच गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील दिले.
परभणी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरामध्ये आरसीपी पथकासाठी रेस्ट रूम आहे. या रेस्ट रूममध्ये काही पोलीस कर्मचारी जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर रागसुधा यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी थेट या रूमकडे जाऊन पाहणी केली. यावेळी 7 पोलीस कर्मचारी जुगार खेळत असल्याचे यावेळी त्यांना पाहायला मिळाले. याचवेळी त्यांच्याकडून पाच हजार रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या 7 जणांमध्ये पाच पोलीस अधीक्षक कार्यालयातील, एक महामार्ग पोलीस आणि एक अँटी करप्शन ब्युरोमधील कर्मचाऱ्याचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणी सातही जणांवर नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयातून जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यात येते. अनेक महत्वाच्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी येथूनच वरिष्ठांचे आदेश जातात. विशेष म्हणजे परभणी ग्रामीण पोलीस दलाचे प्रमुख देखील याच कार्यालयात बसतात. मात्र, त्यांच्याच कार्यालयात काही पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट जुगाराचे डाव मांडला होता. मात्र, याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आर रागसुधा यांनी जुगारी पोलिसांवर कारवाई केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.