मराठा आंदोलकाचा कपडे फाडण्याचा इशारा, रोहित पवार यांचा मोठा निर्णय
पुणे : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रेला स्थगिती दिली आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मराठा समाज आक्रमक झालाय.
मराठा समाजाने राज्यातील हजारो गावांमध्ये नेतेमंडळींसाठी गावबंदी घातली आहे. पण तरीही रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरु असल्याने मराठा आंदोलक योगेश केदार यांनी रोहित पवार यांना यात्रा थांबवण्याचं आवाहन केलं होतं. तसेच रोहित पवारांनी आंदोलन थांबवलं नाही तर आम्ही त्यांचे कपडेसुद्धा फाडू, असा इशारा योगेश कदम यांनी दिला होता. त्यानंतर आता रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन युवा संघर्ष यात्रेला स्थगिती दिली आहे. वातावरण वेगळ्या दिशेला जावू नये म्हणून आपण युवा संघर्ष यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं आहे.
रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा थांबवावी. अन्यथा आम्ही जावून यात्रा थांबवणार, असा इशारा मराठा आंदोलक योगेश केदार यांनी हा दिला होता. रोहित पवार यांनी तात्काळ यात्रा थांबवावी अन्यथा उद्या संध्याकाळपर्यंत त्यांचे कपडे फाडायलादेखील मागेपुढे पाहणार नाही, अशी धमकी योगेश केदार यांनी दिली होती.
रोहित पवार यांना योगेश केदार यांच्या धमकीबाबत प्रश्न विचारला त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "मी स्वतः मराठा आहे. मी भूमिका स्पष्ट केली आहे. मी घाबरलो का? असं तुम्ही मला विचारत असाल तर युवा आत्महत्या करत असतील तर हो मी घाबरलो. संधी मिळत नसेल तर हो मी घाबरलो. जातीय तेढ असेल तर हो मी घाबरलो", असं रोहित पवार म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.