सलोनी पाटीलची राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी : खरा पंचनामा
येथील डीकेटीई सोसायटीच्या इचलकरंजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्याथिर्नी सलोनी संदीप पाटील हिची राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून नुकतीच निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये तिची निवड करण्यात आली आहे.
सलोनी हिने शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये रोड रेस व ५०० मीटर तसेच १००० मीटर स्केटिंग रेस मध्ये अशआ तीनही प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. त्यानंतर तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. सलोनी सध्या पाचवीच्या वगार्त शिकत आहे. तिला स्केटिंगचे प्रशिक्षक सुनील खोत, सविता खोत यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीमुळे सलोनीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.