गणवेश न घालता कोर्टात जाणं पोलिस अधिकाऱ्याला पडलं महागात!
पुणे : खरा पंचनामा
पुणे अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटकेत असलेल्या भूषण पाटीलवर आज कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना फटकारलं आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे सत्रन्यायालयात गणवेश न घालता आले होते. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
भूषण पाटील प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे आज सुनावणीवेळी कोर्टात उपस्थित होते. यावेळी त्यांनी पोलीस गणवेश परिधान न करता साधा गणवेश परिधान केला होता. त्यामुळे कोर्टाने त्यांना फटकारलं.
तुम्ही जबाबदार पदावर आहात तुम्हाला हे वागणं शोभत नाही, असं कोर्टाने पोलिसांना ऐकवलं आहे. कोर्टात येताना गणवेश का परिधान केला नाही, याचं उत्तर पुढच्या १५ दिवसात द्या, अशा शब्दांत कोर्टाने सहायक पोलीस आयुक्तांना नोटीसही बजावलीये.
ललित पाटीलने ससून रुग्णालयातून पलायन केल्यावर ११ ऑक्टोबर रोजी त्याचा भाऊ भूषण पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी पुढे त्याचा मित्र अभिषेक बलकवडेलाही अटक केली. त्यानंतर दोघांनाही सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायाधीश बिराजदार यांनी त्यांना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज पुन्हा या प्रकरणी सुनावणी पार पडलीये.
आज पार पडलेल्या सुनावणीत भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांच्या पोलीस कोठडीत ४ दिवसांची वाढ झालीये. २० तारखेपर्यंत भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलीये. भूषण पाटीलच्या घरून ८ पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले आहेत. ड्रग्स प्रकरणात आणखी ६ आरोपींची नावे निश्चित करण्यात आलीत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.