Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मराठा आरक्षण : सांगली जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार करणार एकदिवसीय उपोषण!

मराठा आरक्षण : सांगली जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार करणार एकदिवसीय उपोषण!



सांगली : खरा पंचनामा

मराठा आरक्षण प्रश्नावरून रविवारी जिल्ह्यातील आमदार-खासदारांना मराठा आंदोलनकानी चांगलेचं धारेवर धरलं. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या पालकमंत्री, खासदार, आमदारांना गाठत मराठा समाजाने प्रश्नांचा भडीमार केला. अगदी राजीनामा देण्यापासून मराठा समाजाचे आमदार खासदार आता काय भूमिका घेणार? यावर आक्रमक पवित्रा घेतला.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदारांकडून मुख्यमंत्र्यांना एक दिवसीय अधिवेशन घेण्याबाबत पत्र तसेच मराठा आरक्षण मागणीसाठी एकदिवसीय उपोषण करण्याचा जाहीर करण्यात आले आहे. उद्या सोमवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सांगली जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार, खासदार मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याचे जाहीर केले. या बैठकीला पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार अनिल बाबर, आमदार विक्रम सावंत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुण लाड, विशाल पाटील उपस्थित होते.

मराठा आरक्षणासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात वणवा पेटू लागला आहे. आज सांगलीत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील खासदार, पालकमंत्री सर्व आमदाराना अडवून धरत जाब विचारला. मराठा आरक्षण प्रश्नी चार दिवसात निर्णय घ्यायला सांगा, नाही तर सांगली जिल्ह्यातील आमदार, खासदारांना चार दिवसात राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी एक दिवसाचे अधिवेशन घेण्याची आग्रही मागणी करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.