न्यूजक्लिक वृत्तसंस्थेतील पत्रकारांच्या घरावर छापा!
चिनी फंडिंगचा आरोप
दिल्ली : खरा पंचनामा
चिनी फंडिंगच्या आरोपांनी घेरलेल्या न्यूज क्लिक या वृत्तसंस्थेवर आज (मंगळवारी) सकाळपासून दिल्ली पोलिसांनी कारवाई केली. संस्थेशी संबंधित अनेक पत्रकारांची पोलिसांनी चौकशी केल्याचे वृत्त आहे.
ऑगस्टमध्येच, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करताना न्यूज क्लिकचे मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांचा दिल्लीतील फ्लॅट जप्त केला होता.
मंगळवारी दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिकशी संबंधित अनेक पत्रकारांच्या घरांवर छापे टाकले. वृत्तसंस्थेला काम करण्यासाठी चीनकडून निधी मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. दिल्लीशिवाय नोएडा आणि गाझियाबादमध्येही पोलीस अनेक ठिकाणी शोध घेत आहेत. दिल्ली पोलिसांनी UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर जवळपास 38 कोटींच फंडिंग चीनकडून आल्याचा आरोप केला आहे.
दिल्लीत अनेक पत्रकार आणि लेखकांच्या घरी पोलिसांच्या विशेष पथकाची धाड पडली आहे. पत्रकार अभिसार शर्मा यांच्यासह अनेक पत्रकारांचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे. संजय राजोरा, भाषा सिंह, उर्मिलेश, प्रबीर पुरकायस्थ, सोहेल हाश्मींच्या घरी धाड टाकण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी तपासादरम्यान अनेक डिजिटल पुरावेही जप्त केले आहेत. यामध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन आणि हार्ड डिस्कचाही समावेश आहे. काही दिवसांपुर्वी, अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने दावा केला होता की, न्यूज क्लिक या जागतिक नेटवर्कचा भाग आहे ज्याला अमेरिकन अब्जाधीश नेव्हिल रॉय सिंघमकडून निधी मिळतो. विशेष म्हणजे सिंघम कथितरित्या चिनी मीडियासोबत जवळून काम करतो. ईडीने सप्टेंबर 2021 मध्ये पुरकायस्थ यांच्याशी संबधित काही ठिकाणांवरही छापे टाकले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.