ड्रग्स प्रकरणातील आरोपी अभिषेक बलकवडेच्या घरातून कोटयावधी रूपयाचं सोनं जप्त!
पुणे : खरा पंचनामा
ससून रुग्णालयात उपचार घेणारा अंमली पदार्थ तस्कर ललित अनिल पाटील याने पलायन केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण अनिल पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक विलास बलवकडे यांना नेपाळ बॉर्डरवरून अटक केली.
त्यांना पुण्यात आणण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. दरम्यान, पोलिसांनी बलकवडेच्या नाशिक येथील घराची झडती केली असता त्यामध्ये तब्बल 3 किलो सोनं आढळून आलं आहे. पोलिसांनी ते जप्त केलं असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.
कोटयावधी रूपयांचे सोनं जप्त करण्यात आल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. पलायन करण्यासाठी घरामध्ये लपवुन ठेवलेल्या सोन्याचा वापर केला जाणार होता असं देखील पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. दरम्यान, अभिषेक बलकवडेने हे सोने ड्रग्सची तस्करी करूनच कमविल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. ललित पाटील आणि अभिषेक बलकवडे हे दोघे भेटल्याचं देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.