Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील गोकुळनगरमधील वेश्‍या अड्ड्यावर छापा; दोघांवर गुन्हा पश्‍चिम बंगाल, बांगलादेशच्या महिलांची सुटका

सांगलीतील गोकुळनगरमधील वेश्‍या अड्ड्यावर छापा; दोघांवर गुन्हा 
पश्‍चिम बंगाल, बांगलादेशच्या महिलांची सुटका



सांगली : खरा पंचनामा

शहरातील गोकुळरनगरमध्ये चालणाऱ्या वेश्‍या अड्ड्यावर विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. त्यात सात बांगलादेशी आणि तीन पश्‍चिम बंगाल अशा दहा महिलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुंटखाना चालवणारी सितारा मतीन शेख (रा. गोकुळनगर गल्ली क्रमांक पाच, मूळ रा. धाना रूपगंज, जि. नारायणगंज, बांगलादेश) आणि खोली भाड्याने देणारा भिवा महादेव शिंदे (वय ३५, रा. अभिनंदन कॉलनी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रेस्क्यू फाउंडेशनच्या तनुजा साहेबराव काळे (वय ३७, रा. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. शहरातील गोकुळनगर येथे बांगलादेशातील महिलांना आणून त्यांच्याकडून जबदरस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती फिर्यादी काळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी विश्रामबाग पोलिसांशी संपर्क साधला. 

माहितीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक पाठवले होते. कुंटणखान्यात बांगलादेशी महिला असल्याचे समजताच पोलिसांनी छापा टाकून दहा महिलांची सुटका केली. त्यांना महिला सुरक्षागृहात ठेवण्यात आले आहे. महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या संबंधित संशयितांवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय पासपोर्ट अधिनियम कलम आणि विदेशी नागरिक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलिस निरिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संदिप वाघमारे, अफरोज पठाण, बसवराज शिरगुप्पी, विक्रम चव्हाण, अमोल भोळे, सुषणा शेवकर, कुमार गुरू थोरे आदिंच्या पथकाने केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.