गुन्ह्याची उकल करण्यासह गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवा
गुन्हे आढावा बैठकीत एसपींचे आदेश
सांगली : खरा पंचनामा
खून, खुनी हल्ला, चेन स्नॅचिंग, घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवा. गुन्ह्यांची उकल तातडीने करण्यास प्राधान्य द्या. गुन्हेगारांच्या वेळीच मुसक्या आवाळून गुन्हेगारीला चाप लावण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी आज मासिक गुन्हे आढावा बैठकीत दिले.
त्यात त्यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी कडक धोरण राबवण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. तसेच आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांनी ‘बेसिक पोलिसींग’ राबवण्याच्या सूचना केल्या.
जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांची मासिक आढावा बैठक घेतली जाते. गुन्हे, गुन्ह्यांची उकल याबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत केली जाते. आजच्या बैठकीत प्रामुख्याने चोरी, मारामारीसह घरफोडी, चेनस्नॅचिंग रोखण्यावर अधिक भर देण्याच्या सूचना केल्या.
प्रामुख्याने गर्दीची ठिकाणांसह उपनगरात गस्तीपथके आणखी वाढवण्यात येणार आहे. बंद घर हेरून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर विशेष नजर ठेवण्यासाठी खास पथके तैनात करण्याच्या सूचना डॉ. तेली यांनी दिल्या. प्रामुख्याने जिल्ह्यातील शहराच्या ठिकाणी चोऱ्यांची संख्या कमी झाली पाहिजे. बेसिक पोलिसींगला राबवण्यावर अधिक भर देण्याच्या सक्त सूचनाही त्यांनी केल्या.
जिल्ह्यात आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. दाखल गुन्ह्यातील पसार आरोपीचा शोध घेण्यासाठी खास पथके तयार करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. आगामी सण-उत्सव प्रत्येक भागातील आढावा डॉ. तेली यांनी यावेळी घेतला. काही संवेदनशील ठिकाणी विशेष सूचनाही त्यांनी दिल्या. फेसबुक, व्हॉटस्अपसह समाज माध्यमावर अक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर विशेष नजर ठेवण्याच्या सूचना सायबर पोलिसांना देण्यात आल्या आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.