अजित पवारांना डेंग्यूची लागण : डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
मुंबई : खरा पंचनामा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. त्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा नाराज असल्याचाही सूर होता. पण अजित पवार यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे आणि त्यांना डेंग्यूचे निदान झाल्यामुळे त्यांनी आपले सर्व कार्यक्रम तुर्तास तरी पुढे ढकलले असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार नसल्याच्या बातम्या येत आहेत. पण प्रसारमाध्यमांना मी हे स्पष्ट करू इच्छितो की, कालपासून त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे आणि त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय मार्गदर्शन आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत. त्यांची तब्येत पूर्णपणे बरी झाली की ते संपूर्ण ताकदीनिशी जनतेच्या सेवेत दाखल होतील." असे ट्विट प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.