Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पिझ्झा उशिरा आल्याने केला गोळीबार, एकाला अटक

पिझ्झा उशिरा आल्याने केला गोळीबार, एकाला अटक



पुणे : खरा पंचनामा

पिझ्झाची ऑर्डर उशीरा आल्याच्या कारणावरून डिलिव्हरी बॉयला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोघांना घराबाहेर काढत गाडीतून पिस्टल काढून वरच्या दिशेने गोळीबार केलेल्या एकाला सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. २३) रात्री ११.१५ वाजता वाघोली परिसरात घडला.

चेतन वसंत पडवळ असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रोहित राजकुमार हुलसुरे या ( रा. समर्थ कृपा बिल्डिंग) आणि बापुसाहेब पठारे (खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या डोमिनोज पिझ्झा मधून आरोपीने पिझ्झा मागविला होता. मात्र पिझ्झा उशीरा आल्याच्या कारणावरून त्याने डिलिव्हरी बॉयला शिवीगाळ आणि मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी दोघांसमवेत आरोपीच्या घरी गेले. आरोपीने दरवाजा उघडून 'तुम्ही इथे का आलात म्हणत फिर्यादीची कॉलर पकडून त्याला घराबाहेर काढले आणि घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीतून पिस्टल काढून ते लोड करून वरच्या दिशेने गोळीबार केला.

यामुळे वरच्या मजल्यावरील एखाद्या व्यक्तीला गोळी लागून मृत्यू ओढवू शकतो याची जाणीव असूनही आरोपीने हे कृत्य केल्याने त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.