सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार यांना पितृशोक
सांगली : खरा पंचनामा
सांगली एलसीबीचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सध्या हातकणंगले येथे कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार यांना गुरुवारी सकाळी पितृशोक झाला. सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक भिमराव रामचंद्र निशानदार यांचे गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
दिवंगत भिमराव निशानदार यांनी सांगलीतील शांतिनिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदीर येथे उपमुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर बिसूर हायस्कूल येथेही त्यांनी काही वर्षे त्यांनी सेवा बजावली. दहा वषापूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांच्यावर सांगलीच्या भारती हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
सांगलीतील अमरधाम स्मशानभुमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.