Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कर्जबाजारी पोलीस बनला चोर: दोंघावर सर्वीस रिव्हॉल्वरमधुन बेछूट गोळीबार!

कर्जबाजारी पोलीस बनला चोर: दोंघावर सर्वीस रिव्हॉल्वरमधुन बेछूट गोळीबार!



मुंबई : खरा पंचनामा

भिवंडी तालुक्यातील अंबाडी-वासिंद रस्त्यावर मैंदे गावाजवळ मोटरसायकलवरून आलेल्या दोघा तरुणांवर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पडघा, कसारा पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या मुंबई पोलिस दलातील सूरज देवराम ढोकरे (वय ३७) याला अटक केली आहे.

ढोकरे हा ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याच्यावर ४० ते ४२ लाखांचे कर्ज झाले होते. कर्जाचे हप्ते थकल्याने तसेच पैशांची चणचण भासू लागल्यामुळे त्याने चोरीचा मार्ग अवलंबल्याचे चौकशीत कबूल केले आहे.

मैंदे गावाजवळ १३ ऑक्टोबरला रात्री फिरोज रफीक शेख (वय २७) आणि अजीम अस्लम सय्यद (वय ३०, चंदनसार, विरार पूर्व) हे गोळीबारात जखमी झाले होते. पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पडघा, कसारा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली.

त्यातून चोरी, दरोड्याच्या उद्देशाने हा गुन्हा झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला होता. त्यानंतर गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर तपास केला. हल्लेखोर अहमदनगर - नाशिक बसमधून पळून जात असताना अहमदनगर पोलिसांच्या मदतीने कोल्हार येथे बसमधून संशयितास शस्त्रासह ताब्यात घेतले.

त्याच्या चौकशीमध्ये तो मुंबईमधील नायगाव पोलिस मुख्यालयात कार्यरत असल्याचे उघड झाले. त्याने सरकारी पिस्टलमधून सय्यद यांच्यावर सहा, तर शेख यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. आरोपी यापूर्वीही दोन वेळा भिवंडीत आल्याचे निष्पन्न झाले आहे. तेव्हा त्याने असे काही गुन्हे केले आहेत का, याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.