अजित पवार गटातील १५ आमदार शरद पवारांच्या संपर्कात?
पुणे : खरा पंचनामा
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जयंत पाटील यांनी दावा केला आहे की, त्यांच्या संपर्कात अजित पवार गटातील १५ आमदार आहेत. त्यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकरणात एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुणे जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन भाषण केलं. त्यावेळी त्यांनी हा दावा केला आहे.
या भाषणात जयंत पाटील यांनी सांगितल की, "अजित पवार गटातील १५ आमदार हे आपल्या संपर्कात आहेत. त्यांची ईच्छा आहे की, पुन्हा ते शरद पवार यांच्याकडे यावेत. पण त्यासंदर्भात अंतिम निर्णय हे शरद पवार घेणार आहेत. "
पाटील म्हणाले की, "पक्ष आणि चिन्हच्या संदर्भात अजित पवार गटात गोंधळ आहे. त्यांना वाटल होत की, आपल्याला पक्ष आणि चिन्ह मिळून जाईल. पण तसं झालं नाही. आपल्या पक्षाचा खालचा कार्यकर्ता हा कुठे ही गेला नाही. त्यामुळे याची दखल निवडणूक आयोगाला देखील घ्यावी लागली आहे."
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.