महाविद्यालयात घुसून लिपिकावर खुनी हल्ला!
बुधगावमधील भर दुपारची घटना
सांगली : खरा पंचनामा
पूर्वीच्या वादातून बुधगाव येथील एका महाविद्यालयात घुसून तेथील लिपीकावर कोयत्याने खुनी हल्ला करण्यात आला. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कवलापूर येथील एकावर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्जुन बजरंग पाटील (वय २५, रा. कवलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महाविद्यालयाचे लिपीक अमित शंकर पवार (वय ४०, रा. कवलापूर) यांनी फियार्द दिली आहे. अर्जुन आणि अमित पवार यांच्यात पूर्वीचा वाद होता. गुरुवारी दुपारी अमित पवार महाविद्यालयात काम करत असताना संशयित अर्जुन तेथे गेला. पूर्वी झालेल्या वादाचा जाब विचारत त्याने अमित पवार यांच्यावर महाविद्यालयातच कोयत्याने हल्ला केला. त्यांनी तो वार चुकवला.
त्यानंतर ते दोघेही महाविद्यालयाच्या बाहेर आले. तेथेही अर्जुन याने जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने त्यांच्यावर पुन्हा हल्ला केला. तोही वार त्यांनी चुकवला. यामध्ये पवार यांचे कपडे फाटले तसेच डाव्या हातावर वार झाल्याने ते जखमी झाले आहे. याप्रकरणी अर्जुन पाटील याच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.