Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सोलापुरातील शेकडो वकिलांचे कामबंद आंदोलन; बार असोसिएशनने केला ठराव

सोलापुरातील शेकडो वकिलांचे कामबंद आंदोलन; बार असोसिएशनने केला ठराव



सोलापूर : खरा पंचनामा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर बार असोसिएशन सोलापूर, सर्व वकील बांधवांच्या वतीने मंगळवारी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. मंगळवारी दिवसभर वकिलांनी एकत्र येत कामापासून अलिप्त राहण्याचा निर्ण घेतला.

दरम्यान, सोलापूर जिल्हयासह संपूर्ण राज्यभर मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे वाहतूक सेवा, एस. टी. बसेस, खाजगी बसेस यावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक वाहने बंद असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील न्यायालयात पक्षकार वकील वर्ग यांना उपस्थित राहणे अशक्य होणार आहे. मोठ्या प्रमाणात वकिल व पक्षकार हे बाहेर गावातून येत असल्याने मोठी अडचण होणार आहे, यासाठी आज मंगळवार ३१ ऑक्टोबर रोजी आरक्षणाच्या आंदोलनाच्या कारणास्तव कामापासून अलिप्त राहण्याचा शेकडो वकीलांनी ठरविले आहे, तसा ठराव देखील सोलापूर बार असोसिएशनमध्ये पारित करण्यात आला. या आंदोलनात शेकडो वकिलांनी सहभाग नोंदविला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.