'दबावाखाली येऊन अपात्रतेचा निर्णय घेणार नाही'!
मुंबई : खरा पंचनामा
सध्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे. मात्र या प्रकरणात निकाल लागण्यासाठी वेळ लागत असल्यानं ठाकरे गटाकडून अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून होत आहे. आपल्यावर होणाऱ्या आरोपांना आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
कोणाच्या दबावाखाली येऊन मी अपात्रतेच्या निर्णय घेणार नाही, मी नियमानुसार निर्णय घेईल. ज्यांना सविधानाची माहिती नाही, ते लोक वेळापत्रकावर आक्षेप नोंदवत आहेत. त्यांना किंवा त्यांच्या टीकेला मला कोणतंही उत्तर द्यायचं नाही. मी नियमात राहुन काम करेल असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राहुल नार्वेकर हे त्यांच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघात गेले असताना तिथल्या स्थानिक नागरिकांवर भडकल्याचा प्रकार समोर आला आहे. राहुल नार्वेकर हे कुलाबा, कोळीवाडा या ठिकाणी पाहणी करत होते. तेव्हा काही स्थानिक लोकांनी राहुल नार्वेकर यांच्याकडे विकासकामांसदर्भात स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यास सांगितलं. यानंतर राहुल नार्वेकर भडकले. इकडे कोणाची मक्तेदारी चालणार नाही. एक-दोन लोकांना घेऊन चालणारा माणूस मी नाही अशा शब्दात त्यांनी सुनावले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.