सांगलीत पोलिसास जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; एकावर गुन्हा
सांगली : खरा पंचनामा
शहरातील विश्रामबाग येथील जयहिंद कॉलनी येथे पोलिसाला किरकोळ कारणातून मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात एकाविरोधात ॲट्रॉसिटीसह मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नितीन पारेख (रा. विजय अपार्टमेंट, जयहिंद कॉलनी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संबंधित पोलिसाने फिर्याद दिली आहे.
संबंधित पोलिस कर्मचारी मुख्यालयात नियुक्तीस आहे. काल सायंकाळी सहाच्या सुमारास ते जयहिंद कॉलनीतील विजय अपार्टमेंटच्या गाळा क्रमांक सहामध्ये आले होते. त्यावेळी संशयित पारेख हा व्हीएस मल्टीसर्व्हिसेस या ठिकाणी आले. त्यावेळी त्याने किरकोळ कारणातून दुकानातील गौरव देशमुख यास मारहाण करण्यास सुरूवात केली. हे पाहून संबंधित पोलिस कर्मचारी त्याठिकाणी गेले. वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी केली.
त्यावेळी पारेख याने विशाल शिंदे यांची कॉलर धरून मारहाण केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करत दमदाटीही केली. त्यानंतर काल रात्री उशीरा संबंधित पोलिसाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नितीन पारेख याच्यावर मारहाणीसह ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला. मिरजेचे पोलिस उपाधीक्षक प्रणील गिल्डा अधिक तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.