मंत्रालयात गाडीला प्रवेश नाकारला, शिंदे गटाच्या आमदाराचा गेटवरच राडा
मुंबई : खरा पंचनामा
मंत्रालयात प्रवेश नाकारल्याने शिंदे गटाचे आमदाराने मंत्रालयाच्या गेटवरच राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. नवीन नियमानुसार आमदाराच्या गाड्यांना मंत्रालयात प्रवेश नसल्याचे सांगत सुरक्षारक्षकांनी गाडी रोखली.
मात्र यामुळे संतापलेले शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांची गाडी काही वेळासाठी गेटवरच उभी केल्याचे पाहायला मिळालं.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना काल कॅबिनेटच्या बैठकीनंतर मंत्रालयाच्या परिसरात घडली. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे आपल्या कामानिमीत्त मंत्र्यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात येत होते. यावेळी हा प्रकार घडला. एबीपी माझाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
यापूर्वी मंत्र्यांच्या गाड्यासोबतच आमदारांच्या गाड्यांना देखील मंत्रालयात प्रवेश दिला जात होता. मात्र शिरसाट यांना गेटवर आता नविन नियमानुसार आमदारांच्या गाड्यांना मंत्रालय परिसरात प्रवेश दिला जाणार नाही असं सांगण्यात आलं. यानंतर संजय शिरसाट यांनी याचा विरोध म्हणून आपली गाडी काही वेळ मंत्रालय गेटवरच उभी केली, ज्यामुळे कोणतीही गाडी मंत्रालयात आत किंवा बाहेर येऊ शकली नाही. अखेर या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुढे येत मध्यस्थी करावी लागली.
अखेर शिरसाट यांच्या गाडीला प्रवेश दिला गेला. मात्र आमदार संजय शिरसाट यांनी या घटनेबद्दल संबंधीत अधिकारी आणि मंत्र्यांकडे निषेध नोंदवल्याची माहिती मिळत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.