अजित पवारांना येऊ देऊ नका, अन्यथा कारखान्यात जाऊ देणार नाही!
बारामती : खरा पंचनामा
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन दिवसेंदिवस राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा संघटना आक्रमक होताना दिसत आहेत. अनेक गावांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे.
आरक्षण दिल्याशिवाय गावात पाऊल ठेऊ नका असा इशारा आंदोलकांनी दिलाय. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला येण्यास मराठा क्रांती मोर्चानं विरोध केलाय. अजित पवारांना बोलावू नका, त्यांनी येऊ नये आशा आशयाचे पत्र माळेगाव पोलिसांना आणि साखर कारखान्याला मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना हे बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला येणार आहेत. मात्र, अजित पवारांच्या या कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चानं विरोध केलाय. अजित पवारांना बोलावू नका, त्यांनी येऊ नये आशा आशयाचे पत्र माळेगाव पोलिसांना आणि कारखान्याला दिले आहे. जर अजित पवार कार्यक्रमस्थळी आले तर अजित पवारांना कारखान्यात जावू दिले जाणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. बारामती तालुक्यात कोणत्याच राजकीय पक्षाच्या लोकांना बारामती फिरु देणार नाही अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चानं घेतली आहे.
दरम्यान, येत्या 28 ऑक्टोबरला अजित पवारांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मोळी पूजन होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच अजित पवारांना येऊ देऊ नका, अन्यथा कारखान्यात जाऊ देणार नाही अशा इशारा बारामतीत मराठा क्रांती मोर्चानं दिलाय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.