Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दसऱ्यापूर्वी दूसरा हप्ता द्या, अन्यथा धुराडे पेटवू देणार नाही : खराडे

दसऱ्यापूर्वी दूसरा हप्ता द्या, अन्यथा धुराडे पेटवू देणार नाही : खराडे



सांगली : खरा पंचनामा 

गतवर्षीचा 400 रुपये हप्ता तातडीने शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करा, अन्यथा साखर गोदामातून बाहेर पडू देणार नाही. यंदाचे धुराडेही पेटू देणार नाही असा इशारा ढोल बजावो आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वसंतदादा कारखान्या समोर सोमवारी ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. या साखर कारखान दाराचे करायचे काय खाली मुंडी वर पाय, तातडीने दुसरा हप्ता 400 रुपये मिळालाच पाहिजे, 400 रुपये द्या अन्यथा धुराडे बंद अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडन्यात आला मुख्य प्रवेश द्वारावर ढोल वादन करून कार्यकर्ते कारखाना कार्यालयात आले. 

त्याठिकाणी आंदोलकांसमोर बोलताना महेश खराडे म्हणाले गत वर्षी साखरेचा दर 3100 रुपये होता आता तो 3800 रुपये वर गेला आहे म्हणजे कारखानदारांना 3800 रुपये प्रति क्विंटल मिळत आहेत त्यातील 400 रुपये शेतकऱ्यांना द्या अशी साधी मागणी आहे जगा त साखरेचा तुटवडा आहे त्यामुळे साखर दर आणखी वाढणार आहेत आमच्या मागणी नुसार सोमेश्वर आणि मालेगाव या कारखान्यांनी 400 रुपये दिले आहेत ही मागणी मान्य न झाल्यास यंदाचे धुराडे पेटू देणार नाही आणि साखरेचा एक ट्रक ही बाहेर पडू देणार नाही प्रसंगी ट्रक फोडू पण 400 रुपये मिळवू.

संदीप राजोबा म्हणाले साखर सम्राटांनी आमच्या मागणी नुसार तात्काळ पैसे द्यावेत अन्यथा त्याची खैर नाही उप पदार्थाचे आम्ही मागत नाही केवळ साखरेच्या वाढीव दराचे आम्ही पैसे मागतो आहोत ही मागणी मान्य न झाल्यास यंदाच्या हंगामावर परिणाम होईल असा इशारा देत आहोत. 

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष महेश खराडे, कार्याध्यक्ष संदीप राजोबा, युवा आघाडी अध्यक्ष संजय बेले, जिल्हा उपाध्यक्ष संजय खोलखुंबे, मिरज अध्यक्ष सुरेश वसगडे, मिरज कार्याध्यक्ष भरत चौगुले, नरवाडचे उपसरपंच बाळासाहेब लिम्बेकाई, रावसाहेब पाटील, सुधाकर पाटील आदी सहभागी झाले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.