Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

डीएनए तपासणी अहवाल पोलीसांना हवा तसा तयार करून दिला अनिकेत कोथळे खून प्रकरण : बचाव पक्षाचा तपास यंत्रणेवर गंभीर आरोप

डीएनए तपासणी अहवाल पोलीसांना हवा तसा तयार करून दिला 
अनिकेत कोथळे खून प्रकरण : बचाव पक्षाचा तपास यंत्रणेवर गंभीर आरोप 



सांगली : खरा पंचनामा

अनिकेत कोथळे खून प्रकरण खटल्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी रासायनीक तज्ञ यांना अनिकेत कोथळे यांचे दात, हाडे, त्वचा, सौ अलका कोथळे, अशोक कोथळे यांचे रक्त तपासणी संदर्भात  तपासले, व त्यासाठी सरकार पक्षाने रासायनीक तज्ञांचे पुणे येथील कार्यालयात पोलीस डीएनए कीट मिळणेसाठी पत्र घेऊन आले होते. डीवायएसपी आमणे  सकाळी वा ७.०० डीएनए किट घेण्यासाठी आले व सायं ५.३० वा सॅम्पल्स घेऊन पुन्हा परत आले व अनिकेत कोथळे याचे बरोबर ते रक्त जुळते असा अहवाल दिला, असा पुरावा सरकार पक्षाने न्यायालयासमोर आणला.

सदर साक्षीदाराचे उलट तपासामध्ये बचाव पक्षाने अत्यंत महत्वाच्या मुद्यावर सदरचा अहवाल हा कसा खोटा तयार केला आहे यावर प्रश्नांची सरबत्ती केली व साक्षीदारास होय असे उत्तर देणेस भाग पाडले. पुणे येथील रासायनीक पृथक्करण प्रयाोग शाळा ही सकाळी १०.३० उघडते व सायंकाळी ५.३० बंद होते व त्यास नंतर कुलपे लावली जातात हा मुद्दा समोर तर आणला. तसेच संध्याकाळी ५..३० वाजले नंतर संबधित पोलीसांना दुसरे दिवशी बोलावेल जाते यावर त्यांनी होय असे उत्तर दिले.

सदर पत्रावर दि. १२/११/२०१७ रोजीचे पत्रावर दि.१३/११/२०१७ रोजीचा शिक्का हा सकाळी १०.३० वाजले नंतर दिला जातो बरोबर आहे. पोलीसांनी अहवाल मागणी केलेल्या पत्रामध्ये डी.एन.ए. तपासणी दोन दिवसां मध्ये करणेस विनंती केली होती, यावरहि त्यांनी होय असे उत्तर दिले. सबब सदरची तपासणी दि.१३/११/२०१७ रोजी सुरू करून दि. १५/११/२०१७ रोजी पुर्ण झाले नंतर अहवाल पाठविला होता या प्रश्नावर बरोबर असे उत्तर दिले.

तपासणी अहवाल हा संगणका मधून प्रिंट होऊन येतो व त्यामध्ये तारीख, संदर्भ हे सुध्दा प्रिंट होऊनच येते हे बरोबर आहे असेही त्यांनी सांगितले.
आपण सदर तपासणी केलेला व न्यायालयाकडे पाठविलेले अहवालमध्ये उप संचालकाचे श्री. आर. एस. माळी यांची सही आहे,  असे आपण म्हणाला, पण कोर्टसमोर दाखल अहवाला मध्ये त्यांची सही नाही हे बरोबर आहे असे ते म्हणाले.

ती सही नसल्याचे दि. १३/११/२०१७ रोजीचे पत्रामध्ये पोलीसांनी अनिकेत अशोक कोथळे हे नाव लिहून ११ सॅम्पल्स ची तपासणी ए. बी. सी. यांचे बरोबर करावी असे म्हंटले आहे हे बरोबर आहे. आपणास मिळालेल्या सर्व सॅम्पलची तपासणी करावी लागते हे बरोबर आहे. पोलीसांनी पडद्यावर उडलेल्या रक्ताची डीएनए तपासणी होणेसाठी जे रक्त दिले हे अनिकेत कोथळे याचे नाही असे तपासणीत समोर आले आहे.

आपणास मयत इसमाचे घटक हे त्याचे आई वडीलांबरोबर जुळतात का? या तपासणी साठी पाठविलेले त्यांचे रक्त, तपासणी साठी योग्य होते. डीएनए मध्ये येणारा Y घटक हा वडीलां कडून फक्त मुला मध्येच येतो हे बरोबर आहे. आपण मयत इसमाचे घटक, आई, वडील व इतर मिळालेला घटक मयताचे दाताची तपासणी केली   आहे.

अहवाल मध्ये मयत इसमाचे घटक, आई, वडील व इतर मिळालेला घटक असे ४ रकाने लिहावे लागतात. आपण सदर अहवालामध्ये अशोक कोथळे यांची रक्त तपासणी केली असतानाही, त्तो तपासणी अहवाल व त्यांचे नाव लिहले नाही. (साक्षीदार सांगतो की, पोलीसांनी फक्त आईची तपासणी करा असे सांगितले) अनिकेत कोथळे यांचे वडिलांचे रक्ताची तपासणी करू नका असे पोलिसांनी, आपणास पत्र लिहलेले नाही. वाहनाचे हॅंडल, स्टेरिंग, गिअर, काठी, बेडशीट या ठिकाणी ते ज्यांना हाताळले आहे त्यांच्या डीएनएचा पुरावा सापडतो.

दि.१५/११/२०१७ रोजीचा अहवाल हा मयताचे घटकां बरोबर न जुळणारा होता व तो पोलिसांनी  जसा  हवा आहे तसा नव्हता हे खोटे आहे.
सदर घटक अनिकेत कोथळे याचे नव्हते. दि.३०/११/२०१७ रोजी पोलिसांनी परत पत्र पाठविले व अहवाल मागीतला, म्हणून आपण त्याच दिवशी त्या अहवाल वर हाताने दि.३०/११/२०१७ ही तारीख व  संदर्भ लिहला व तो अहवाल  पोलीसांना दिला हे बरोबर आहे.
दि.३०/११/२०१७ रोजीचे  अहवालात अशोक कोथळे यांचे नाव नमूद नाही. ते नाव न लिहण्याचे कारण काय होते हे सांगू शकता - या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही असे  उत्तर दिले. 

सदरकामी ॲड. विकास बा. पाटील शिरगांवकर यांना घेतलेल्या उलटतपासा मध्ये विचारण्यात आलेल्या  प्रश्नांना सदर साक्षीदाराने दिलेली उत्तरे ही, सरकार पक्षाने केलेला तपास व डीएनएचा अहवाल तपास यंत्रणेवर संशय निर्माण करत आहे असे जनमाणसांत बोलले जात आहे

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.