पोलिसांची जमीन; माझा संबंध नाही; अजित पवारांनी घेतले जयंत पाटलांचे नाव
मुंबई : खरा पंचनामा
पुण्यातील येरवडा येथील पोलिस विभागाच्या जमीन प्रकरणाशी माझा अर्थाअर्थी संबंध नाही, असा खुलासा करत माजी पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केलेले आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी फेटाळून लावले.
पुस्तक लिहिताना खळबळजनक असेल तर प्रसिद्धी मिळते असे पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीला वाटले असेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
येरवडा येथील पोलिस खात्याचा भूखंड 'बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा' या तत्वावर विकसित करण्यात येणार होता. जागेची किंमत तीन कोटी असताना सरकारला १५ कोटी रुपयांचा फायदा होणार होता. मात्र, पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्तांनी जमीन हस्तांतरित करण्यास नकार दिला. त्यांच्या नकारानंतर या कामाकडे मी ढुंकूनसुद्धा पहिले नाही, असे अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.
तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळात २००८ मध्ये गृह विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला होता. यासाठी नेमलेल्या समितीने प्रस्ताव तयार केला. मात्र, याला तत्कालीन पोलिस आयुक्तांचा विरोध असल्याची बाब बैठकीत माझ्या निदर्शनास आणून देण्यात आली. हे प्रकरण १५ वर्षापूर्वीचे आहे. यासंदर्भातील समितीत मी नव्हतो. कुठेही माझी स्वाक्षरी नाही. तत्कालीन आर. आर. पाटील आणि जयंत पाटील या दोन गृहमंत्र्यांशी संबंधित हा विषय आहे, असे पवार म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.