सांगलीत चहाच्या टपरी चालकावर
एडक्याने हल्ला!
सांगली : खरा पंचनामा
संजयनगर परिसरातील रेल्वे पुलावळील टपरी चालकावर एडक्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो टपरी चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री त्याची तब्येत आणखी चिंताजनक बनली होती.
राजेंद्र रामचंद्र नाईक असे त्या टपरी चालकाचे नाव आहे. पैशाच्या प्रकरणातून दोघांना हा हल्ला केल्याचे समजते आहे. याबाबत रात्री उशीरापर्यंत संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. जखमी नाईक याची चहाची टपरी आहे. संशयित काल सायंकाळी त्याच्याकडे आले. त्यांच्यात पैशांवरून जोरदार वादावादी झाली. वाट टोकाला गेल्यानंतर संशयितांनी एडक्या सारख्या हत्याराने नाईक याच्यावर हल्ला केला.
यात त्याच्या पायाला गंभीर जखम झाली. अतिरक्तस्त्राव झाल्याने प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत त्याची प्रकृती चिंताजनक होती. घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली. जखमीच्या नातेवाईकांकडून रात्री उशीरापर्यंत फिर्याद घेतली जात होती. नाईक हा जखमी असल्याचे पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.