मुख्यमंत्री अचानक कोल्हापुरात, प्रशासनाची गुप्तता
कोल्हापूर : खरा पंचनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री अचानक कोल्हापूरला येणार असून ते कणेरी मठावर काडसिध्देश्वर स्वामींची भेट घेणार आहेत. दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांना मराठा आरक्षण आंदोलकांनी अडवल्याने शिंदे यांच्या दौऱ्याबाबत प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळली आहे.
दुपारपासूनच प्रशासनाने कॅन्व्हाय आणि प्रोटोकॉलची तयारी केली होती. परंतू नेमके कोण येणार हे स्पष्ट होत नव्हते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार शिंदे रात्री आठनंतर कोल्हापूर विमानतळावर येणार असून ते कणेरी मठावर महाराजांना भेटून लगेचच मुंबईला रवाना होणार आहेत. मात्र राजेश क्षीरसागर हे मुंबईत असून ते या दौऱ्यात नाहीत. शिंदे यांच्या या अचानक दौऱ्यामुळे मात्र चर्चांना उधाण आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.