ललित पाटीलने नदीत फेकलेले १०० कोटींचे ड्रग सापडले!
मुंबई : खरा पंचनामा
तुरुगात असताना हॉस्पिटलाईज होण्यासाठी पायऱ्यांवरून पडण्याचे नाटक करणारा ड्रग माफिया ललित पाटीलने पोलिसांना आणखी एक धक्कादायक माहिती दिली आहे. यानुसार मुंबई पोलिसांनी गिरणा नदीपात्रात मध्यरात्रीच शोधमोहिम सुरु केली होती. पहाटेपर्यंत पोलिसांच्या हाती करोडोंचा ड्रगसाठा लागला आहे.
ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांनी नाशिक सटाणा रस्त्यावरील लोहनेर ठेंगोडा गावातून जाणाऱ्या गिरणा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग फेकले होते. ते शोधण्यासाठी पोलिसांनी रात्रीच मोठे ऑपरेशन राबविले होते. पोलिसांच्या टीमने सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत सुमारे चार तास पाण्याखाली शोधमोहिम राबविली आहे.
रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हरची यासाठी मदत घेण्यात आली आहे. तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने रात्रीच्या अंधारात पाण्याखालील ड्रग्जच्या पुड्या शोधण्यात आल्या आहेत.
ललित पाटीलचा चालक सचिन वाघने हे ड्रग्जची पॅकेट्स पाण्यात फेकली होती. सुमारे दोन गोण्या भरून ही पाकिटे होती. ४० ते ५० किलो भरतील एवढा हा ड्रग साठा आहे. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे १०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. देवळाजवळच्या सरस्वतीवाडी भागातून १५ किलोची पाकिटे मिळाली आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.