Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवार मुख्यमंत्री होणे हे स्वप्नच राहिल!

अजित पवार मुख्यमंत्री होणे हे स्वप्नच राहिल!



मुंबई : खरा पंचनामा

अजित पवार मुख्यमंत्री होणे हे स्वप्नच राहिल, ते वास्तवात येणार नाही, असे स्पष्ट करत महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत येण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या वेळी शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव छगन भुजबळ यांनीच मांडला होता. आता स्वतः भुजबळ यांनी आपण खोटे बोललो अशी कबुली दिली आहे. त्यामुळे सर्वांसमोर सत्य आले आहे.

अनेक राज्यांमध्ये स्थिर सरकार फोडून भाजपने सत्ता हस्तगत केली आहे. भाजपविरोधातील सर्व पक्षांना आम्ही एकत्र घेणार आहोत, १९७७ मध्ये विरोधी पक्षांनी निवडणूक लढवली त्यावेळी पंतप्रधानपदाचा चेहरा नव्हता. तरीही देशातील जनतेने केंद्रात सत्ता बदल केला होता. त्यामुळे इंडिया आघाडी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणार का याला महत्त्व देत नाही

कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करणे चुकीचे आहे. जो व्यक्ती कंत्राटी पद्धतीने काम करतो त्याचा करार हा ९ महिने किंवा १२ महिने असतो. त्यामुळे त्याची कामाशी बांधिलकी राहत नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याचा घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.