आर. आर. आबांच्या कुटुंबीयांच्या उपोषणात भाजप नेत्यांची उपस्थिती!
सांगली : खरा पंचनामा
सांगलीमध्ये आर. आर. आबा गट विरुद्ध खासदार संजय पाटील यांच्यात पाण्यावरून संघर्ष पेटला आहे. खासदार संजय पाटील यांच्याकडून आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांच्या उपोषणावर सातत्याने टीका करण्यात येत आहे.
दुसऱ्या बाजूला मात्र भाजप नेते व माजी जिल्हाध्यक्षांनी सुमनताई आणि रोहित पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. उपोषणस्थळी पहिल्याच दिवशी माजी भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. एका बाजूला भाजप खासदार उपोषणाला विरोध करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला भाजपच्याच खासदारांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख उपोषणाला जाहीर पाठिंबा देत असल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान, सांगलीचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी उपोषणस्थळी जात भेट घेतली. भेट घेतल्यानंतर ते म्हणाले की, आबा कुटुंबाच्या आंदोलनाकडे सरकारने अद्याप हवा तसा प्रतिसाद दिला नाही. सरकारने तातडीने पाऊले टाकून सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी द्यावी. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन प्रश्न मार्गी लावावा.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.