Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आंतरराज्य सराईत चोरट्यास अटक, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त सांगली, रत्नागिरी, कोल्हापुरातील घरफोडीचे ५ गुन्हे उघड, सांगली एलसीबीची कारवाई

आंतरराज्य सराईत चोरट्यास अटक, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त
सांगली, रत्नागिरी, कोल्हापुरातील घरफोडीचे ५ गुन्हे उघड, सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

सांगली, रत्नागिरीसह कोल्हापूर जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या सराईत आंतरराज्य चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून तीन जिल्ह्यातील पाच गुन्हे उघड करण्यात यश आले आहे. त्याच्याकडून चोरीचा १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

लखन अशोक कुलकर्णी ऊर्फ सचिन राजू माने (वय ३०, रा. पंढरपूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्यासाठी एलसीबीचे निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथकाला सराईत गुन्हेगार लखन कुलकर्णी हा कर्नाटक येथून जामिनावर बाहेर आला असून तो सांगली जिल्ह्यात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. 

त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने तासगाव, आष्टा, रत्नागिरी, दापोली, कोल्हापूर येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून घरफोडीतील १७ लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, सिकंदर वर्धन, उपनिरीक्षक कुमार पाटील, अच्युत सूर्यवंशी, बिरोबा नरळे, संदीप नलावडे, सागर लवटे, संदीप गुरव, विक्रम खोत, मच्छिंद्र बर्डे, उदय माळी, अमर नरळे, वनिता चव्हाण, ज्योती चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.