Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मलिकांनी अजितदादांना पाठिंबा दिला का? जयंत पाटील म्हणाले...

मलिकांनी अजितदादांना पाठिंबा दिला का? जयंत पाटील म्हणाले...



कोल्हापूर : खरा पंचनामा

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी देखील अजित पवार यांना पाठिंबा दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अखेर यावर आता जंयत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. नवाब मलिक यांना बाहेर बोलण्यास न्यायालयानं मज्जाव केला आहे. त्यामुळे ते असं कुठेही बोलले नाहीत. नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत जात आहेत, हे मी प्रसार माध्यमांमधूनच ऐकत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांना बाहेर बोलण्यास न्यायालयानं मज्जाव केला आहे. त्यामुळे ते असं कुठेही बोलले नाहीत. नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत जात आहेत, हे मी प्रसार माध्यमांमधूनच ऐकत आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी पक्षाची निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे, त्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांची बाजू भक्कमच आहे, त्यात शंका घेण्याचं काही कारण नाही. दुसरा गट त्यांच्या मताप्रमाणे दावा करणारच, मात्र पक्ष पक्षाच्या ठिकाणी आहे. आमदार गेले म्हणून पक्ष त्यांच्या पाठीमागून जात नाही, असं सुप्रीम कोर्टानेच शिवसेनेच्या बाबतीत भाष्य करताना म्हटलं आहे. देशभरातील पदाधिकाऱ्यांनी अफेडीविट करून दिलं आहे, ज्यामध्ये शरद पवार यांनाच अध्यक्ष म्हणून मान्यता दिल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील टोला लगावला आहे. राहुल गांधींना बारामतीत आणायचं कारण नाही, एकटे शरद पवारच काफी आहेत. काही आमदार गेले म्हणून जनाधार गेला असं समजण्याचं कारण नाही, नाहीतर बावनकुळेंना दारोदारी जाऊन पुढचा पंतप्रधान कोण असं विचारायची पाळी आली नसती असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.