आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; पंतप्रधान मोदींच्या सभेला जाणाऱ्या बसेस अडवून परत पाठवल्या
शेवगाव : खरा पंचनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यासाठी नागरिकांना घेण्यासाठी आलेल्या गाड्या परत पाठवण्यात आल्या आहेत. गावबंदी असल्यानं शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथील मराठा समाजाच्या वतीनं निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मनोज जरांगेच्या आवाहानानंतर मंत्री विखे यांच्या कुटुंबीयांविरोधात मठाचीवाडी येथील सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे.
शेवगाव तालुक्यातील भातकूडगाव येथे पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी जाणाऱ्या बसेस अडवण्यात आल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला असून गावागावत नेत्यांना गावबंदी केली जात आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांची गाडी देखील अडवण्यात आली आहे. तसेच, काही गावकऱ्यांनी मराठा आरक्षणाबाबत अरुण मुंडे यांना देखील जाब विचारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीतील साईमंदिरात दर्शनासाठी येणार आहे. दुपारी 1 वाजता पंतप्रधान मोदी साईमंदिरात दर्शन घेतील. मोदींच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा आणि आरती होईल. साईबाबा संस्थानच्या वतीने पंतप्रधानांचा सत्कार केला जाईल. मात्र पंतप्रधान मंदिरात असताना अर्ध्यातासाठी दर्शन रांग बंद राहणार आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अकोले या दोन ठिकाणी विविध प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. 2018 मध्ये साई समाधी शताब्दी सोहळ्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत आले होते, त्यानंतर पाच वर्षांनी पंतप्रधान मोदी साई समाधीचे दर्शन घेतील.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.